स्वर्गवासी कै.किरण जोरवर पाटील यांच्या स्मरणार्थ मिरे येथे पाणपोई चालू
मिरे येथे पाणपोई चालू करण्यात आली आहे तहानलेली तृष्णा भागविण्याकरता धर्म नाही म्हणूनच उन्हाळा आला की सामाजिक कार्याचे भान ठेवून काही सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असत परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आहे आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला आणि समाजातील सहायता संपली की काय म्हणूनच दुष्काळात पाणपोया लुप्त होत चालल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे तहानलेल्यांना पाणी पिऊन ही आपली संस्कृती आहे त्यामुळे पूर्वी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्था संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील मिरे गावचे रहिवासी शरद जोरवर पाटील यांनी मिरे येथे राणूबाई चौक कै .किरण जोरवर पाटील प्रतिष्ठान तर्फे वाटसरु साठी पाणपोई उपलब्ध करून दिली आहे
नागरिकांची तहान भागवण्याचे नागरिकांची तहान भागवण्याचे पुण्य लाभावे या उद्देशाने सेवा भावतूनही काम केली जायची रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी पिऊन जायची सध्या उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या आबालवृद्ध महिला वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हॉटेल व चहाची टपरी चा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी बांधिलकीतून नागरिकांना थंडगार पाणी मिळावं या हेतूनं कै. किरण जोरवर पाटील प्रतिष्ठान तर्फेपाणपोई सुरू करण्यात आली आहे