Type Here to Get Search Results !

पंढरपूर | करकंब येथे माझे गाव माझी वसुंधरा सामाजिक बांधिलकी समजून वृक्षसंवर्धनासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!

करकंब येथे माझे गाव माझी वसुंधरा सामाजिक बांधिलकी समजून वृक्षसंवर्धनासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....!


माझी वसुंधरा माझे झाड अभियानाला झाली सुरुवात
वृक्ष लागवड व जतन करण्याचा महिलांनी केला निर्धार

करकंब प्रतिनिधी:- लक्ष्मण शिंदे

पंढरपूर तालुक्यातील करकंब माझी वसुंधरा या अभियानाला करकंब मध्ये सुरुवात झाली आहे.



सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त करकंब ग्रामपंचायतीने महिला मेळाव्याचे आयोजन करून त्यामध्ये आरोग्य सेविका आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक-शिक्षिका पोलीस भगिनी यांना एकत्रित येऊन त्यांना फळझाडांची वाटप करून माझी वसुंधरा माझे झाड या अभियानाला सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा प्राध्यापिका सुचिता देशपांडे व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संगीता पाटील सरपंच तेजमाला पांढरे ग्रामपंचायत सदस्य कल्पना देशमुख वैशाली देशमुख रेखा गायकवाड बिल्किष बागवान सुनीता हराळे रेखा गायकवाड ज्योती शिंगटे व्यवहारे बचत गटाच्या सुनीता देशपांडे राधिका विधाते सूरया आतार व इतर महिला भगिनींच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रमुख अतिथी डॉक्टर संगीता पाटील यांनी वृक्षांचे महत्त्व महिलांच्या आरोग्याबाबत बचत गटा बाबत मार्गदर्शन करून महिलांमध्ये जनजागृती व त्यांच्या सकस आहार याबाबत चर्चा करून महिलांना प्रबोधन केले.

उपस्थित मान्यवरांना व महिलांना फळझाडे आंबा चिक्कू पेरू बकुळाचे फुलाच्या झाडाची वाटप करून हे झाड जोपासण्याचे संकल्प प्रत्येक महिला भगिनींनी या वेळेस केला.

भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांनी बचत गटाला कर्ज वाटपाचा चेक यावेळी देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब व्यवहारे ,बापू शिंदे ,माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे एडवोकेट शरच्चंद्र पांढरे ,विशाल देशमुख आदी उपस्थित होते.

प्रत्येक महिलांनी वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली पाहिजे करकंब मध्ये लेकी चे झाड चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आप प्रत्येक महिलांनी वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली पाहिजे करकंब मध्ये लेकी चे झाड चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपलं गाव माझी वसुंधरा मध्ये बसण्यासाठी प्रत्येक अनेक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्ष संवर्धन केले पाहिजे व करकंब ग्रामपंचायतच्या वतीने जून मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ तेजमाला पांढरे यांनी लं गाव माझी वसुंधरा मध्ये बसण्यासाठी प्रत्येक अनेक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्ष संवर्धन केले पाहिजे व करकंब ग्रामपंचायतच्या वतीने जून मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ तेजमाला पांढरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad