Type Here to Get Search Results !

आंबेगाव | मोटर सायकल वरून पडून महिलेचा मृत्यू

मोटर सायकल वरून पडून महिलेचा मृत्यू


लोणी तालुका आंबेगाव येथील,संजीवनी एकनाथ पंचरस वय वर्षे ४५रा. लोणी. ह्या काल ता.१८/३/२०२२रोजी राजगुरूनगर येथे नातेवाईकांकडे गेले असता, काम आटपून परत लोणी कडे येत असताना, रस्त्यामध्ये मोटारसायकल पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.


दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, डोक्याला पाठीमागून मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले , एक मुलगी, नातवंडे , पती असा परिवार आहे.त्यांच्या वर लोणी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने लोणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


                                       लोणी धामणी प्रतिनिधी -कैलास गायकवाड 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News