Type Here to Get Search Results !

वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची अशी ही सेवा

वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची अशी ही सेवा



हिमायतनगर प्रतिनिधी :- जाबुवंत मिरासे



सध्या रशिया. यूक्रेन या दोन देशांमध्ये भयावह युद्ध चालू असून यामध्ये शालेय शिक्षण घेण्यासाठी अनेक भारतीय विद्यार्थी या देशांमध्ये अडकून आहेत परिणामी पाल्यांना मोठी चिंता सतावत आहे नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी गंगा मिशन राबवत संबंधित देशातून हजारो भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप मायदेशी आणले असले तरी अद्यापर्यंत बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



युद्ध म्हटले तर प्रत्येक जण आपापले जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु नुकतेच तीन ते चार महिन्यापूर्वी युक्रेन या देशातील चेरनीविट्सी येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील हरीभक्त पारायण नाथा पाटील चव्हाण यांचे चिरंजीव ओमप्रसाद यांनी मोठ्या धैर्य दाखवत रोमानिया या बॉर्डरवर अडकलेल्या आपल्या सहकारी जवळपास दोन ते तीन हजार सहकारी मित्रांना भोजन पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन स्वतः स्वतः वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हाताने भोजन बनवले 


सहकारी मित्रांसोबत जाऊन संबंधित बॉर्डरवर अडकलेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना भोजनासह अंथरूण-पांघरूणा ची व्यवस्था केली या कामी चव्हाण पाटील यांच्यासोबत डॉक्टर विवेक यादव सर. यांच्यासमवेत तन्मय पोतदार. रुपेश घोडके. मुकेश चौधरी. तनिष्क सावंत. अभिजीत पाटील. सौरभ रोकडे. प्रियेश गावंडे. या युक्रेन येथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी रोमानिया ठिकाणी जाऊन भोजन व्यवस्थेसह अत्यावश्यक सुजेचे व्यवस्था केली त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad