अनोळखी इसमांनी चोरले मोबाईल मंचर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
लोणी धामणी - प्रतिनिधी -कैलास गायकवाड
पेठ तालुका आंबेगाव पुणे नाशिक हायवे च्या कडेला असलेल्या घरांमध्ये उत्तर भारतीय मजूर राहात आहेत. फिर्यादी विकास कुमार पुरन शिंह वय बावीस वर्ष,धंदा मजुरी,सध्या मुक्काम नाशिक पुणे हायवे च्या कडेला दर्ग्याजवळ,पेठ तालुका आंबेगाव. मूळ राहणार दपामाई ता. जसराना जिल्हा फिरोजाबाद उत्तर प्रदेश
१ तारखेला रात्री ११:१५ वाजता मौजे पेठ गावच्या हद्दीत दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व दुसरा सात हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल मोटर सायकल नंबर MH 14 JS 4418 या गाडीवरून येऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
मंचर पोलिस स्टेशनचे अंमलदार पोलीस हवालदार नाडेकर हे पुढील तपास करत आहेत.