Type Here to Get Search Results !

निगंनुर परिसरांमध्ये संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

निगंनुर परिसरांमध्ये संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी निगंनुर: मैनोदिन सौदागर 

उमरखेड तालुक्यातील निगंनुर गावामध्ये व परिसरातील ,सह बहुतांश गावांमध्ये बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,


महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमी शूरवीरांचा वारसा लाभलेला आहे तसेच या मातीमध्ये संतांच्या पवित्र विचारांचा सुगंध आज तागायत दरवळत आहे संतांचे विचार कोणत्याही जाती पुरते मर्यादित नसतात तर त्यांचे मार्गदर्शन भजन प्रवचन प्रबोधन किर्तन हे सर्व जनतेच्या जडणघडणीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात याच पावन भूमीमध्ये भटक्या जातीमध्ये जन्माला येऊन समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवणारे संत सेवालाल महाराज ज्यांना बंजारा समाजाचे कुलदैवत मानले जाते,असे थोर समाज सुधारक जगद्गुरु सद्गुरु संत सेवालाल महाराज यांची 283 जयंती निगंनुर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, 

यावेळी बंजारा समाजातील महिला व पुरुष बंजारा वेशभूषा प्रदान करून आपापल्या गावातुन संत सेवालाल महाराज यांच्या पालखी ची मिरवणूक बिरजुलाल मुडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad