एका झोपडीत गुलाब उगवला..
नांदेड प्रतिनीधी प्रमोद जाधव.
आपल्या फुटक्या नशिबाचे व आठरा दारीद्रीचे चटके खाणाऱ्या एका सालदाराच्या झोपडीत. गुलाबाचा फुल, उगवला असुन, याची चर्चा पुर्ण तालुकाभर कौतुकीचे शब्द येत आहे. या सर्व परीणामाचे श्रेय, गजानन मुंडे, यांच्या परीवाराचा असल्याचे स्थानीकचे लोक म्हणत आहेत, सर्व शालेय सहीत्याची गरज जेंव्हा होती त्यावेळी गजानन मुंडे, यांनी पोहच केल्यामुळे गजानन मुंडे . यानी एक गरीब घरान्यात एम.बी.बि.एस. घडवलं. अशी चर्चा तालुका भर आहे.. तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी, च्या विद्यार्थ्यांनी अजय टारपे, याच्या यशाचा बोध घ्यावा व त्याच्यापासून प्रेरणा मिळावी हा उदात्त हेतू उराशी बाळगून बोधडी (बुद्रुक) येथील अठरापगड जाती धर्माच्या सुख-दुःखात मदतीचा हात पुढे करणारं दानशूर व्यक्तिमत्व, , राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते गजानन पाटील मुंडे, यांनी सोलापूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षास प्रवेश घेऊन आलेल्या अजय टारपे, याचा जाहीर सत्कार केला.त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
बोधडी येथील गोविंद पेट्रोलियम वर सदर सत्कार सोहळा पार पडला. अखंड समाज सेवेची तळमळ, आवड असलेल्या गजानन पाटील मुंडे, यांच्या हातून सत्कर्माचे कार्य घडत असते. यावेळी मुंडे म्हणाले की जर अत्यंत होतकरू, निराधार असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आज पर्यंत मी मदतीचा हात पुढे करीत होतो. आणि यापुढेही करीतच राहणार असून,अजय टारपे, या गुणवंत विद्यार्थ्यांनी माझ्या हातून घडलेल्या मदतीचे बिज, करून दाखवले आहे. त्याचा मला अभिमान वाटतो. त्याचे मार्गदर्शन, परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे. व समाजात नावलौकिक व्हावे. असेही सत्कार सोहळ्याप्रसंगी मुंडे, यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांचे बंधू श्रीनिवास गोविंदराव मुंडे, विश्वनाथ वाडकर, सरपंच तुकाराम कोकाटे, संदीप सावंत, लक्ष्मण मुंडे, नवनीत जोंधळे, गणेश केंद्रे, जितू मुंडे,श्रीकांत बोईनवाड, आदि.उपस्थित होते. आणि सर्वांनी अजय टारपे यास पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या...