Type Here to Get Search Results !

आझादी का अमृत महोत्सव नारीशक्ती प्रभाग संग वार्षिक सर्वसाधारण सभा .निंगनूर

आझादी का अमृत महोत्सव नारीशक्ती प्रभाग संग वार्षिक सर्वसाधारण सभा .निंगनूर 



नारीशक्ती व उमेदचा उपक्रम

प्रतिनिधी निगंनुर : -मैनोदिन सौदागर 

    उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत आसलेले निगंनुर प्रभागातील १७ ग्रामसंघाच्या बेरोजगारांना प्रशिक्षणा विषयी बोलन्यात आले .गावातील बेरोजगार युवक युवतींना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मिती व आर्थिक विकासात भर घालण्याच्या उद्देशाने पं . दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजने अंतर्गत निंगनूर येथे दि . २५ फेब्रुवारी रोजी नारीशक्ती प्रभाग मंच व पं स उमरखेड अंतर्गत उमेद यांच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला .
       
 निंगनूर प्रभागातील युवक युवती आणि मनरेगा मध्ये काम केलेले १८ ते ४५ वयोगटातील महिला व पुरुषांना पं. दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय , शेळी पालन , कुक्कुट पालन . फोटोग्राफी , व्हिडीओग्राफी , इलेक्ट्रीक मोटर रिवायडींग अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी निंगणूर प्रभागातील १७ ग्राम पंचायतींचे ग्रामसंघ व उमेद अंतर्गत कौशल्य समन्वयक ज्ञानदिप कानिंदे, प्रभाग समन्वयक एस डी . साळवे, तालुका व्यवस्थापक नितीन पूरी , रामदास इटकरे ' संजय तरवरे अनिल वाढवे यावेळी ग्रामपंचायतचे सचिव विनोद चव्हाण सरपंच सुरेश बरडे उपसरपंच. मेहमुनिसाबेग वलिउल्हाखाँन.जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे. बिरजुलाल मुडे.देविदास खंदारे. विनोद गव्हाळे. इमरानखाँन.सुनील बरडे .गजानन नावडे. व ग्रामपंचायतचे कर्मचारी पांडुरंग महाले.कैलास पुरी.विनोद भोंगाळे. गजानन पुरी.यांची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad