Type Here to Get Search Results !

हिमायतनगर येथील दोन पोलिसासह एक पत्रकार एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ

हिमायतनगर येथील दोन पोलिसासह एक पत्रकार एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ


हिमायतनगर येथील दोन पोलिसासह एक पत्रकार एसीबीच्या जाळ्यात 
हिमायतनगर प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे 

हिमायतनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वडगाव तांडा येथील एका व्यक्तीच्या गुन्ह्याचे स्वरूप कमी करण्यासाठी २ हजारांची लाच घेणाऱ्या २ पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पत्रकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले असून तब्बल ७ तास विचारपूस केल्यानंतर हिमायतनगर पोलीस डायरीत दि.१५ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 वडगाव तांडा येथील फिर्यादी किरण गंगाराम राठोड यांनी हिमायतनगर येथील पोलीस कर्मचारी व खाजगी व्यक्तीकडून लाच मागणी होत असले बाबत दिनांक १३/०२/२०२२ रोजी तक्रार दिली होती. पोलीस हेड कॉन्स्टेबल वनदेव कनाके हे तकारदार यांचे भावाने विरूध्द हिमायतनगर येथे तक्रार दिले वरून मोठी कार्यवाही न करणेसाठी तसेच तकारदार यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही करून सोडुन देणेसाठी ५ /०००/-- रू. लाचेची मागणी करीत असंल्याचे तक्रारीत नमूद केले होते.  

तकारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिवंधक विभाग, नांदेड कार्यालयाकडुन दिनांक १४/०२/२०२२ रोजी पंचासगक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये मुद्रांक विक्रेता सय्यद मनान यांनी कनाके व शेख मेहबुब यांचे करीता तक्रारदार यांचेकडे ५,०००/-- रू. लाचेची मागणी मागणी करून तडजोडीअंती २,०००/- रू. स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून दि.१४ रोजी पोलीस स्टेशन हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या सापळया दरम्याण लोकसेवक कनाके व शेख महेबुव यांनी तकारदार यांचेकडुन २,०००/- रू, लाचेची रक्‍कम स्विकारली म्हणुन वनदेव गोवर्धन कनाके, पोलीस कॉस्टेबल शेख महेबुब शेख जिलानी व एक खाजगी व्यक्ती यांच्या विरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरंन. २५/२०२२ प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक औरंगाबाद डॉ. राहुल खडे, अपर पोलीस अधिक्षक, लाप्रवि नांदेड, धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक, लाप्रवि नांदेड राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले, सपोउपनि किशन आरेवार, बालाजी तेलंग, जगलाथ अनंतवार, गणेश तालकोकुलवार, शेख मुजोब, गजानन राऊत यांनी पार पाडली आहे. 

या कार्यवाहीस लाचलुचपत विभागाने सर्व नागरीकांना अवाहन केले की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्यचार संबधाने कांही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर टोलफ्री हेल्पलाईन कंमाक "१०६४, कार्यालयाचा फोन कंमाक ०२४६२- २५३५१२, श्री राजेंद्रे पाटील, पो.उप अधि.यांचा मोबाईल क्रमांक ७३५०१९७१९७ संपर्क करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News