Type Here to Get Search Results !

Attack on Kirit Somaiya | किरीट सोमय्यांवर हल्ला करणारे शिवसेना कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर ...

Attack on Kirit Somaiya | किरीट सोमय्यांवर हल्ला करणारे शिवसेना कार्यकर्ते पोलिसांसमोर हजर ... 
पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात पुणे महापालिकेच्या परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत . या प्रकरणाला आता कोणते वळण लागणार आणि शिवसैनिकांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे , पदाधिकारी चंदन साळुंके , किरण साळी , सूरज लोखंडे , रूपेश पवार , राजेंद्र शिंदे , सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुण्यात शिवसैनिकांच्या अटकेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे . शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत .
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता . दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते . त्यामुळे शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले आहेत . यांनतर त्यांना न्यायलायात नेण्यात येणार आहे . त्यानंतर त्यांना जामीन मिळणार की कोठडी याकडे लक्ष लागले आहे . दरम्यान , न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान ठेऊन आम्ही सर्व शिवसैनिक उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे सकाळी 10 वा उपस्थित राहणार आहोत , अशी माहिती पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी काल दिली होती . त्यानुसार आपला शब्द पळत संजय मोरे आणि कार्यकर्ते आज सकाळी पोलीस ठाण्यात दाखल झाले . या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News