करकंब प्रतिनिधी: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा सडक परिवहन मंत्री नामदार नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे होळे विविध गावासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना बॅच एक अंतर्गत रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली असून यासाठी 14 कोटी 63 लाख 13 हजार मंजूर रक्कम करून कार्यारंभ करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे ही कामे आता कामे लवकरच आता लवकरच मार्गी लागणार आहेत.
पंढरपूर तालुक्यातील करकंबभोसे(मधला रस्ता) होळे(लांबी 11कि.मी.)मंजूर रक्कम 730.38, करकंब प्राजिमा 8 , घोटी ते तालुका हद्द(लांबी4.2किमी) मंजूर रक्कम280.96, ओझेवाडी सरकोली ते शंकर गाव (लांबी6.03 किमी) मंजूर रक्कम451.79 या रस्त्यांच्या कामांच्या मंजुरीसाठी कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. हा निधी मंजूर करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. हा निधी मंजूर केल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील या गावातील ग्रामस्थांतून आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वी तुळजापूर ते वैराग माढा करकंब अकलूज ते शिंगणापूर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आला आहे.