तुळजापूर ते वैराग-माढा-मोडनिंब- करकंब-ते अकलूज मार्गे शिखर शिंगणापूर पर्यंत राष्ट्रीय राज्यमार्ग होणार.
वैराग, माढा, मोडनिंब, करकंब, या गावांचे वाढणार महत्व.
करकंब प्रतिनिधी:- माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मा.नितीन गडकरी, केंद्रीय सडक परिवहन राजमार्ग मंत्रालय, यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून, तसेच या मंत्रालयाकडे दिनांक २२.१० २०२१ रोजी नियोजित तुळजापूर ते वैराग, माढा, मोडलिंब करकंबमार्गे अकलूज शिखर शिंगणापूर पर्यंत राष्ट्रीय राजमार्ग रस्ता करण्याबाबतचे लेखी पत्र दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने सडक परिवहन राजमार्ग मंत्री मा.नितीन गडकरी यांनी या नियोजित राष्ट्रीय राजमार्गाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्यामुळे आता तुळजापूर ते करकंबमार्गे शिखर शिंगणापूर हा मार्ग सामान्य प्रवासी व भाविकांसाठी सोयीचा होणार आहे.
तुळजापूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे तर शिखर शिंगणापूर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने तुळजापूर बार्शी माढा,पंढरपूर, माळशिरस, तालुक्यातील या भागातून मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त तुळजापूर तसेच शिखर शिंगणापूरकडे जात असतात.या राज् महामार्गामुळे त्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. सदरचा हा मार्ग तुळजापूर वैराग, माढा, मोडलिंब, करकंब,अकलूज ते शिखर शिंगणापूर असा प्रस्तावित आहे. हा रस्ता करण्याची मागणी वारंवार केली जात होती. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.रणजितसिंह निंबाळकर यांनी हाती घेतले आहे. यामुळे तुळजापूर, बार्शी,माढा, पंढरपूर, करकंब,अकलूज माळशिरस शिखरशिंगणापूर या ग्रामीण भागातील नागरिकांना हा राज् महामार्ग प्रवासासाठी सोयीस्कर होणार आहे.