Type Here to Get Search Results !

पत्रकारा विषयी अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी.

पत्रकारा विषयी अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी.
          उमरखेड प्रतिनिधी :- मैनोदिन सौदागर

 पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, समाजात घडणाऱ्या अन्यायाविषयी आवाज उठवणारे एक सक्षम असे मध्यम. मात्र या चौथ्या स्तंभाला मलिन करण्याची वृत्ती काही व्यक्तीमध्ये असून त्यामुळे पत्रकारांचा अपमान होत आहे.उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथील खालीक अली नवाब या व्यक्तीने व्हाट्सअप च्या माध्यमातून पत्रकारांच्या चारित्र्यहनन केले आहे व त्यांच्या प्रतिमेला तडा दिला. निंगनूर येथील इंडियन टायगर ग्रुप या सामाजिक माध्यमात पत्रकार काहीही करू शकत नाही, पत्रकारांमुळे चिमणी सुद्धा उडत नाही अशा शब्दात पोस्ट टाकून समस्त पत्रकारांचा अपमान केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी व सदर व्यक्तीवर कडक कारवाईच्या मागणी साठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड च्या वतीने आज बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना निवेदन सादर करून सदर व्यक्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, मैनोदीन सौदागर, गजानन गंजेवाड , उदय पुंडे, मारुती गव्हाळे, गजानन नावडे, मोहन कळमकर, कमलाकर दुलेवाड व संघटनेचे इतर पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad