त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांचा आधारवड आज खऱ्या अर्थाने कोसळला आहे.
निर्भिड व निडर नेते असलेल्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून व आमदार म्हणून काम करत असताना राज्यातील वंचित बांधवांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठीची त्यांची धडपड व तळमळ उभा महाराष्ट्र पाहत होता.