सोलापूर शहर व विशेषत:
हद्दवाढ भागातील बहुतांश भाग हा गुंठेवारी भागातून विकसित होत आहे. मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून गुंठेवारी अधिनियामान्वये नियमितीकरणाचे बांधकाम परवानगी प्रकरणे थांबविण्यात आलेली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुंठेवारी बांधकाम परवानगी सुरु करण्यात आलेली नाही, याउलट मा. आयुक्त यांनी त्या प्लॉटची मोजणी करून आणा मगच बांधकाम परवानगी देण्यात येईल परंतू गुंठेवारीच्या अधिनियमामध्ये अशाप्रकारची कोणतीही नोंद नाही. यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांनी जा.क.नं.आ/वै/678, दि.22/12/2021 यानुसार यांनी आपल्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.
मलायका अरोराने असा बेडरूमचा व्हिडिओ शेअर केल्याने यूजर्स ट्रोल करत आहेत
राज्यातील पुणे महानगरपालिकेच्या वाढीव क्षेत्रातील (हद्दवाढ भाग) गुंठेवारी अधिनियमान्वये परवानगी देत असताना, गुंठेवारी विकासाचा कच्चा नकाशा तरतूद नसलेने मोजणी नकाशा अपेक्षिले जात नाही. तथापि, गुंठेवारी विकासाचा कच्चा नकाशा विकास योजनेशी सांगड व साधर्म साधून आरक्षण अथवा इतर वापर विभाग तपासून नियमीतीकरणाचे परवानगी दिले जाते असे समजले. तसेच औरंगाबाद, नाशिक व लातूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागामध्ये परवानगी देण्यात येत आहे. याच धर्तीवर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील हद्दवाढ भागामध्ये गुंठेवारी बांधकाम परवानगी रितसर मिळण्याकरीता अभिप्राय तात्काळ देण्यात यावे. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना निवेदन दिले.
याबाबत नागरीकांमध्ये मा. आयुक्त यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात नाराजी निर्माण होत असून मा. आयुक्त यांनी तात्काळ बांधकाम परवानगी न दिल्यास मा. मंत्री महोदय यांच्या समवेत बैठक आयोजित करून सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी आग्रही भुमिका घेण्याचे सांगितले.