Type Here to Get Search Results !

रमाई घरकुल योजनेंतर्गत 835 घरकुलांना मंजूरी यासाठी 10 कोटी येणार खर्च

सातारा दि . 21 ( जिमाका ) : रमाई घरकुल निर्माण जिल्हास्तरीय समिती ( ग्रामीण ) ची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली . या बैठकीमध्ये सन 2021-22 रमाई घरकुल आवास योजनेंतर्गच्या 835 घरकुलांना मंजुरी देण्यात आली . या बैठकीला आमदार दिपक चव्हाण , जिल्हाधिकारी शेखर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई , समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे , यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते . पालकमंत्री श्री . पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये रमाई आवास योजनेंतर्गतच्या 835 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे . या घरकुलांसाठी 10 कोटी 2 लाख इतका निधी खर्च करण्यात येणार आहे . अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत : च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही . पर्यायाने त्यांना झोपडीमध्ये वास्तव्य करावे लागते . ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad