Type Here to Get Search Results !

Covid-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये पन्नास हजार सानुग्रह मदत- मुख्याधिकारी धैर्यशील जाधव

Covid-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये पन्नास हजार सानुग्रह मदत- मुख्याधिकारी धैर्यशील जाधव

कोवीड १९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणे कामी समिती गठित करणे कामी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी दिनांक 16-12 -2021 रोजी आदेश दिलेले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणू चा (covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 च्या खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार दिनांक 14 मार्च 2020 रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तसेच दिनांक 14 मार्च 2020 च्या अधिसूचनेमध्ये नमूद नियम 10 नुसार सदर नियमांची अंमलबजावणी करणे कामी जिल्हाधिकार्‍यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 30-06-2021 रोजी च्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक 11-09-2021 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती covid-19 या आजाराने निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये पन्नास हजार इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी अकलुज नगरपरिषद मुख्याधिकारी यांना covid-19 मुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निकट नातेवाईकांना सानुग्रह अनुदानाचे वितरण अधिक सुविधाजनक व्हावे.तसेच त्यांना काही प्रशासकीय दृष्टीने अडचणीचे निराकरण करण्यासाठी आदेश दिलेले आहेत.
अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. धैर्यशील जाधव यांनी अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील covid-19 मुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आवाहन केले आहे की, अकलूज नगरपरिषदेचे कर्मचारी ज्यावेळेस आपल्या घरी माहिती घेण्यासाठी येतील. तेव्हा त्यांना सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी व सहकार्य करावे. सदर कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना अर्जदाराचा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा बँकेचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्ती चा तपशील, त्यांचा आधार क्रमांक ,मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, इतर निकट नातेवाइकांचे ना- हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र देऊन नातेवाईकांनी सानुग्रह वितरीत करण्याकामी मदत करावी. तसेच covid-19 या आजारामुळे मयत पावलेल्या व्यक्तींचे जे नातेवाईक स्वयंस्फूर्तीने माहिती देऊ इच्छितात त्यांच्यासाठी अकलूज नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तेथे येऊन संबंधित नातेवाईकांनी माहिती उपलब्ध करून द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad