Type Here to Get Search Results !

सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज क्षेत्रातील सामाजीक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज क्षेत्रातील सामाजीक सेवा गौरव पुरस्कार जाहीर 
  महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

सु लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील सप्त खंजेरी दक पंकजपाल महाराज राठोड यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दि. 30 12-2021 गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. माणुसकी चा पाचवा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 10:00 वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेठि साठि 01:00 वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 31 व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी सामाजिक तळागळातील जनतेच्या उत्थानासाठी तळमळीने काम करणाऱ्या युवकांना चे प्रेरणा स्थान आदरणीय सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज उर्फ पंकज खंडू राठोड यांचे प्रबोधन आणि सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहे. समाजप्रबोधनाचा वसा घेत आजचा तळागळ्यातील हजार पेक्षा जास्त कार्यक्रम महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक दिल्ली ते तेलंगणा राज्यात पंकजपाल यांनी बंजारा. मराटी. हिदीं. भाषेत प्रबोधन केलेले आहे. याशिवाय सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असून सुसंस्कार शिबिर आदर्श ग्राम निर्मिती शेतकरी आत्मबळ वाढविण्यासाठी प्रबोधन व जनजागृती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रक्तदान शिबिरे घेने दिव्यांग यांचा विवाह सोहळा चे मेळावे घेने वृक्षसंवर्धन ग्रामगीता प्रचार इत्यादी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात पंकज पाल महाराज अग्रेसर आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा

व इतर संस्थांचे बरेचसे पुरस्कार प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे आजची तरुण पिढी जी व्यसनाकडे वळलेली आहे त्यांच्या साठी ते आपल्या किर्तनाच्या माध्यमातून व आपल्या वाणीतून कितीतरी तरुणांना व्यसनमुक्त करून चांगले जीवन जगण्याचे मार्ग दाखविले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार मंच प्रसार व प्रचार सर्वत्र करण्याच्या उद्देशाने ग्रामगीतेचे बंजारा बोली भाषेत भाषांतर करून ते प्रचार प्रसार करण्याची मोहीम पंकज पाल यांनी हाती घेतली आहे. शेतकऱ्याचे आत्मबल वाढवण्यासाठी जनजागृती च्या माध्यमातून बळीराजा चेतना अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना परावृत्त करून आत्मबल वाढवण्यासाठी ते जनजागृती करतात त्यांना शासनाने देखील पुरस्कार देवुन सन्मानित केले आहे. माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. ह्या पुरस्काराबद्दल सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज राठोड यांचे वैश्विक विकास सामाजिक संस्था चे संचालक अजय जी झरकर सर उद्देश सोशल फाउंडेशन उमरखेड अध्यक्ष दिपक ठाकरे पुसद येथील माणुसकीची भिंत चे अध्यक्ष व सर्व सदस्य व समाजामध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad