Type Here to Get Search Results !

शुरवीर संभाजी करवर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा संपन्न

शुरवीर संभाजी करवर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा संपन्न
छत्रपती शिवराय व अंगरक्षक वीर संभाजी करवर,जिवाजी महाले जिगरबाज मावळ्यांच्या शौर्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने शिवप्रताप दिनाचे आयोजन श्रीपुर येथील गणेश हाँल येथे सांयकाळी 7:00 वाजता करण्यात आले. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून भव्य मिरवणूक काढण्यात आली. इतिहास अभ्यासक किरण भांगे यांच्या संकल्पनेतून व भिमराव भुसनर,रोहित काळे यांच्या संयोजनातून संभाजी करवर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन व लोकार्पण करण्यात आले.
      तसेच कु.वैष्णवी थोरात(शिरवळ) यांचे अफजलखानाचा वध या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले.यावेळी संभाजी करवर यांचे वारसदार परमेश्वर करवर,राहुल रेडे पाटील,विक्रम लाठे, नाभिक महामंडळाचे देविदास काळे, मौला पठाण,नितीन वाघमारे, आण्णासाहेब भुसनर, मच्छिंद्र व्हरगर, बच्चन साठे, केशव लोखंडे, ह.भ.प. आण्णा महाराज भुसनर,रमेश करवर उद्योजक विजय भुसनर, उद्योजक ऋषिकेश यमगर,सतीश करवर,महादेव बंडगर,रामचंद्र करवर ,बब्रुवान भुसनर (इतिहास अभ्यासक) सुर्यकांत खुळे,शिवराम गायकवाड, राहुल सराटे, पैलवान विजय यमगर,धनेश डांगे, हर्षवर्धन खंडागळे, विठ्ठल जाधव, महेश सपकाळ, शिवाजीराव घोडके यांसह असंख्य शिवप्रेमी,नाभिक व हटकर समाज बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवानेते रोहित काळे, हटकर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय हाटकर, मयूर जाधव, लक्ष्मण सदगर,बबलू काशीद,अमर हाटकर, चांगदेव साळुंके, अर्जुन भुसनर, गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब काशीद सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News