Type Here to Get Search Results !

नागपूर शहरात प्रथमच बेवारस,रस्त्यावरील मानसिक रुग्ण, अशा लोकांच्या कोरोना संसर्गापासून बचावासाठी लसीकरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला

"My Help... Your Safety"
 "पीस ऑफ होम मल्टीपर्पज सोसायटी (P. A. R. I. 'People's Always Republican and Independent') अंतर्गत या संस्थेमार्फत नागपूर शहरात प्रथमच बेवारस,रस्त्यावरील मानसिक रुग्ण, अशा लोकांच्या कोरोना संसर्गापासून बचावासाठी लसीकरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
माजाचा असा भाग जो समाजात आहे पण त्याला राहायला जागा नाही,खायला अन्न नाही व त्याची मानसिक स्थिती स्थिर नाही,अशा लोकांची लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.कारण हे लोक त्यांना स्वतःच्या जीवाची किंमत कळली नसली तरी त्यांच्यामार्फत सामान्य जनतेला कोरोना चा संसर्ग होण्याची शक्यता आहे 
कारण या घटकाकडून कुठल्याही प्रकारची कोरोनाविषाणू विरोधाची उपाय योजना केली जात नाही व करणे शक्यही नाही यामागे संस्थेचा उद्देश असा की समाजाचा हा अविभाज्य घटक सर्वत्र पसरलेला आहे व त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ओळख पत्र किंवा मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे लसीकरण होणे कुठेही शक्य नव्हते परंतु त्यांच्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग हा लस घेतलेल्या सामान्य माणसाला कोरणा विषाणूची लागण करू शकतो किंवा करेलच त्यामुळे सामान्य जनता लस घेऊन देखील सुरक्षित राहणार नाही त्यामुळे "माय हेल्प... युवर सेफ्टी" या उपक्रमा मार्फत "पीस ऑफ होम मल्टीपर्पज सोसायटी" या संस्थेने नागपूर महानगरपालिका व तसेच उपमहापौर मनीषा धावडे मॅडम व नगरसेविका मंगला गौरी मॅडम दिघोरी,झेड एम ओ डॉक्टर झरारिया नेहरू झोन यांच्यासमोर उपक्रमाची रूपरेषा मांडली व याला आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या परवानगीची मदत मिळाली व या सर्वांच्या मदतीने व तब्बल पंधरा दिवसाच्या प्रयत्नाने हा उपक्रम सर्वप्रथम नागपूर शहरात या संस्थेमार्फत हा अशक्य होणारा उपक्रम यशस्वी रित्या पूर्णत्वास घडवून आणला. 
प्रथमच दिवशी 62 लाभार्थ्यांना लस देण्यात आली व चार दिवस त्यांना संस्थेच्या आवारात ठेवण्यात येत आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे आरोग्य संबंधित अडचणी भासल्यास त्यांच्यावर उपचार करता येईल व सोबतच या बेवारस निराधार लोकांना पुन्हा रस्त्यावर न सोडता त्यांच्या त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल या संपूर्ण उपक्रमाला यशस्वी करण्यामागे ताजू सरिया रोटी बँक , सारथी ट्रस्ट व शुभ भोजन, शिव भोजनालय गांधी गेट महाल, यांची मोठ्या प्रमाणात मदत मिळाली
"पीस ऑफ होम मल्टीपर्पज सोसायटी" चे अध्यक्ष शैलेश शेजे उपाध्यक्ष वर्षा शेजे सचिव प्रारुप बोरजे तसेच संस्थेचे सभासद भारती पडोळे,सौरभ मोवळे, विराज गायकवा, चेतना अजबैले, निधी वासनिक,पल्लवी दोडके, अमोल पुरी, रिता ठाकरे ,चंद्रशेखर झाडे व तसेच प्रकल्प संचालक सारथी ट्रस्ट अमित नगरारे यांच्या उपस्थितीत  लसीकरणाचा उपक्रम पार पडल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News