*वेळापूर-बोरगाव रस्त्याची चौकशी करा :राहुल बिडवे*
माळशिरस तालुक्यातील बोरगाव वेळापूर रस्त्याचे काम गेली दोन वर्षापासून संथ गतीने चालू आहे सदर कामाचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टरला मिळाले असून रस्त्याचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झालेले आहे खडीकरण न करता थेट डांबरीकरण केले बोरगाव पासून तीन किलोमीटर रस्ता केलाच नाही उर्वरित रस्ता हा आतापासूनच खराब होत असून नागरिकांना रस्त्यावरून येता-जाता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सदर कामांमध्ये बांधकाम विभाग अकलूज मधील अधिकारी मॅनेज असल्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी केला आहे
रयत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी रयतचे युवा नेते रणजित चव्हाण ,भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बाजीनाना सरगर, राजकुमार बिडवे ,राजकुमार देशमुख, वैभव कोरे उपस्थित होते सदर रस्त्याचे तातडीने काम केले पाहिजे उर्वरित तीन किलोमीटर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण केलेच नाही उर्वरित रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सदर कामाचे ऑडिट करून तातडीने चौकशी करण्यात यावी राहिलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल बिडवे यांनी दिला.