पालघर:सौरभ कामडी
आज मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील कणसरी ढाबा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय शेतकरी व पशुपालक प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला पंचायत समिती माजी सभापती प्रदीप वाघ अध्यक्षस्थानी होते.
या मेळाव्याला संबोधित करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की शेती हा व्यवसाय आपला पिढी जात व्यवसाय असून आपल्या नव्या पिढीने शेती कडे वळले पाहिजे,आज जे आदर्श शेतकरी व पशुपालक आहेत ते मोखाडा तालुक्याचे खर भुषण आहे असे गौरवोद्गार शेतकरी व पशुपालकां बाबत वाघ यांनी काढले.
यावेळी गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी सांगितले की पंचायत समिती सदैव शेतकरी बांधवांना सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे.आपण पंचायत समितीच्या कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले.
मोखाडा नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष व आदर्श पशुपालक नवसु दिघा यांनी देखील दुग्ध व्यवसायात मिळवलेल्या यशाची माहिती शेतकऱ्यांना दिली.
तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी व पशुपालकांनी आपली यशोगाथा यावेळी सादर केली.
याप्रसंगी उपस्थित आदर्श शेतकरी व पशुपालक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला सह उपायुक्त कुलकर्णी, मोखाडा तालुका कृषी अधिकारी जोशी, सरपंच गीता पाटील, हिरामण पाटील,पोशेरा उपसरपंच युवराज हडळ, उपसरपंच नंदकुमार वाघ, कृषी अधिकारी गोडे,चौरंगे, ग्रामसेवक मंगेश पाटील,पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पोटे यांनी केले तर कणसरी ढाबा मालक जयराम वाघ यांनी उत्तम आयोजन केले.
