Type Here to Get Search Results !

जि.प शाळेला प्राप्त झाले आंतरराष्ट्रीय स्वरूप . डोलारा शाळेचा कायापालट

जि.प शाळेला प्राप्त झाले आंतरराष्ट्रीय स्वरूप . डोलारा शाळेचा कायापालट


पालघर
सौरभ कामडी मोखाडा तालुक्यात डोलारा येथेे जिल्हा परिषदेची शाळा असून दुर्गम भागातील गरीब घरातील सुमारे 200 आदिवासी मुले येथे शिक्षण घेतात. गेल्या दशकापासून या शाळेची गंभीर दुरावस्था झाली होती त्यामुळे मुलांच्या शिक्षण व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी मुलांना गावातील मंदिर किंवा ग्रामस्थांच्या घराबाहेरील मोकळ्या जागेत शिक्षण घ्यावे लागत होते. शासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत होते. शाळेच्या शिक्षकांनी ही समस्या स्पार्क फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या निदर्शनास आणून देताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या संस्थेने आपल्या आदर्श शाळा प्रकल्पा अंतर्गत सदर शाळेचे आवश्यक तेथे पुनर्बांधणी, दुरुस्ती करून 5 वर्गखोल्या,प्रयोगशाळा, स्वयंपाक गृह,स्वच्छतागृह यांचे सर्वंकष नूतनीकरण घडवून आणले. मृतप्राय अवस्थेत असलेल्या या शाळेला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे शाळेच्या वर्गखोल्यांना छ.शिवाजी महाराजांच्या गडांची नावे देण्यात आली आहेत. मुलांच्या सुरक्षित व आनंददायी शिक्षणाचा मार्ग प्रशस्त झाला असल्याने शिक्षक व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान वाशिंद शाळेचे देखील नूतनीकरण झाल्याने मागील 4 वर्षात स्पार्क फाउंडेशन ने पुनरुज्जीवन केलेल्या शाळांची संख्या 20 झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News