Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद मोकाशीपाडा, तालुका जव्हार जिल्हा पालघर शाळेत BSF जवानाच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

जिल्हा परिषद मोकाशीपाडा, तालुका जव्हार जिल्हा पालघर शाळेत BSF जवानाच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न


पालघर:सौरभ कामडी
        आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा मोकाशीपाडा येथे सकाळी ठीक 8.30 वाजता BSF सैनिक श्. प्रवीण हनुमंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत कवायत संचालन, साक्षरता शपथ, व विविध सांस्कृतिक उपक्रम घेऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवराना सुप्त गुणांचे दर्शन घडविले.यावेळी केंद्र समन्वयक . अमोल मोकाशी सर उपस्थित होते. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.. जवान प्रविण पवार साहेबांनी देशसेवेचे महत्व सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगात विविध कौशल्य असतात सर्वच क्षेत्रात प्रगती करा.अनेक ठिकाणी संधी उपलब्ध आहेत असे आव्हान त्यांनी केले. मी सुद्धा एका जिल्हा परिषद शाळेत शिकलो. याचा मला अभिमान आहे. आज माझ्या हस्ते ध्वजारोहण करून सैनिकांबद्दल आदरभाव दाखवला विद्यार्थ्यांनाही अभिमान वाटला. मी सर्वांचा आभारी आहे असे मत पवार यांनी व्यक्त केले यावेळी शा. व्य. समिती अध्यक्ष, सदस्य ,माता पालक, शिक्षक पालक, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक . दिपक चौधरी सरांनी उपस्थितांचे आभार मानून गोड खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता केली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News