Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिर वाकडपाडा येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र घुटकेश्वर महादेव मंदिर वाकडपाडा येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी


पालघर:सौरभ कामडी.
मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील प्राचीन शिवमंदिरात श्री घुटकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परीसरातील भाविकांनी आज सकाळपासून च गर्दी केली आहे.
भजन किर्तन स्वाध्याय परिवार कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समितीने केले असल्याची माहिती घुटकेश्वर महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितले.
सकाळी परीसराती दिंड्या हरहर महादेव चा जयघोष करत या तिर्थक्षेत्रात येतात, भाविकांच्या जयघोषात महाअभिषेक, महाआरती करण्यात आल्याने आज घुटकेश्वर मंदीराचा परीसर शिवमय झाला होता.
हे तिर्थक्षेत्र प्राचिन काळापासून चे आहे, महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास योजनेतून या ठिकाणी अनेक विकासकामे करण्यात आली असल्याची माहिती समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी दिली आहे का
आज परीसरातील अनेक व्यावसायिकांनी फराळ,खेळणी,गृह उपयोगी वस्तू चे स्टॉल लावण्यात आले होते त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांनी खरेदीचा आनंद देखील घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad