Type Here to Get Search Results !

पोशेरा | छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पोशेरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


पालघर:सौरभ कामडी
पोशेरा (ता._ मोखाडा___) – पीएम श्री केंद्र शाळा पोशेरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गावातून महाराजांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढून करण्यात आली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. ढोल-ताशांच्या गजरात आणि मोठ्या थाटामाटात मिरवणूक पार पडली.

यानंतर शाळेत जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली तसेच देशभक्तीपर नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रदीपजी वारघडे उपस्थित होते.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र बदादे, उपाध्यक्ष चंचला ताई वाघ, सदस्य मुकणे ताई, तसेच मुख्याध्यापक निरगुडे सर, निखडे सर, सोनवणे सर, कोरपे सर, आजी-माजी विद्यार्थी, गावातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी भारतीय परमाणु ऊर्जा निगम लिमिटेड, तारापूर यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व साहित्याचे वाटप माननीय प्रदीपजी वारघडे यांच्या हस्ते करण्यात आले.

उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीचा जागर आणि जल्लोषपूर्ण वातावरणात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad