पालघर:सौरभ कामडी
आज सुर्यमाळ गावातील जेष्ठ नागरिक, निराधार महिला व गरजु लोकांना 150 ब्लँकेट, खाद्य तेल,साखर व फळे वाटप करण्यात आले.
ऐन हिवाळ्यात ब्लँकेट वाटप केल्या मुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी ट्रस्ट चे चेअरमन भवरलाल जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सुर्यमाळ गावात येऊन आम्हाला आनंद झाला आहे.
दरवर्षी इतरत्र कुठेही अन्नधान्य व
जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येते मात्र या पुढे मोखाडा तालुक्यात येण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन भवरलाल जैन यांनी केले.
ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश लायन जैन यांनी देखील गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी माजी सभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की आपण ऐन हिवाळ्यात
दिलेल्या ब्लँकेट मुळे जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.वाघ यांनी बॉम्बे मॅटल चॅरीटेबल ट्रस्ट चे आभार मानले.
यावेळी सुर्यमाळ चे माजी सरपंच जेष्ठ नेते विष्णू हमरे व सरपंच गीता गवारी, उपसरपंच शिवराम हमरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यमाला चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन भवरलाल जैन, अध्यक्ष सुरेश लायन जैन, डायरेक्टर रतनलाल जैन, नरेंद्र भाई जैन,आझादभाई जैन,जितु भाई,पारस भाई जैन,पंकद जैन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमा साठी दशरथ पाटील,चंदु खोरगडे यांनी उत्तम आयोजन केले.
