Type Here to Get Search Results !

मोखाड्यात क्रीडा व विविध गुणदर्शन स्पर्धा.

मोखाड्यात क्रीडा व विविध गुणदर्शन स्पर्धा. 

मोखाडा शिक्षण विभागाचा स्तुत्य कार्यक्रम 


पालघर: सौरभ कामडी
                कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे म्हटले तर मोखाडा शिक्षण विभाग हा नेहमीच तत्पर असल्याचे यामागील अनेक कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनावरून दिसून आले आहे.यावेळी मोखाडा शिक्षण विभागाकडून क्रीडा व विविध गुणदर्शन स्पर्धांचा कार्यक्रम पार पडला आहे. 30 डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन पोशेरा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी झाले होते. तर १ जानेवारी नवीन वर्षात विविध गुणदर्शन स्पर्धा मोरखडक जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी पार पडल्या. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साखरी ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल मोखाडा शिक्षण विभागाबाबत गौरव उद्गार देखील काढले यावेळी भोंडवे यांनी सांगितले की याच शाळेत आम्ही सुद्धा शिकलो असून शाळाच्या विकासासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी असो आणि भरीव मदत देखील करू असे आश्वासन देखील यावेळी दिले. 
     यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विस्तार अधिकारी वसंत महाले यांनी या स्पर्धेचे महत्त्व विशद केले.यावेळी महाले यांनी सांगितले की दोन दिवस आपल्याकडे क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये अनेक मैदानी खेळ सुद्धा खेळले गेले. मात्र आज विविध गुणदर्शन स्पर्धा होणार आहेत खरंतर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण असतात कुणी खेळांमध्ये पुढे असतं,तर कोणी वकृत्व मध्ये पुरे असतं अशा सर्व स्पर्धांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धात आपले कौशल्य दाखवत असतात यामुळे ज्यांना मैदानी खेळात कौशल्य दाखवता आले नाही अशांसाठी देखील ही विविध गुणदर्शन स्पर्धा असते यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगात काही उपजत गुण असतात त्यातूनच मग वकृत्व वाद विवाद स्पर्धा नाटक नृत्य समूह गायन अशा सर्व स्पर्धातून विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्यात येते तालुक्यातून निवड झालेली विद्यार्थी हे जिल्हेवर पाठविण्यात येत असल्याचे देखील यावेळी महाले यांनी सांगितले. 
     कार्यक्रमासाठी पोशेरा ग्रामपंचायतचे सरपंच मनोहर नवले, गटशिक्षणाधिकारी गीता मसराम, विस्तार अधिकारी भरत गारे, विस्तार अधिकारी किरण शिंदे,तालुक्यातून आलेले सर्व शिक्षक वृंद,केंद्रप्रमुख, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बात्रे, व्यवस्थापन समितीचे सदस्य भाऊ वैजल झोले बाबा आणि सर्व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News