पालघर :सौरभ कामडी
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखाड्यात जशने ईद मिलाद कमेटी व आय झोन ऑप्टिकल्स नासिक तसेच साई बाबा हार्ट इन्स्टिट्यूट अण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त वतीने मोखाडा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर,ईसीजी तसेच शूगर व जनरल बॉडी चेक अप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नाशिक येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली महाले, डॉ.इम्रान शेख व डॉ.तुषार सोनवणे आदी उपस्थित होते.
शिबीर दरम्यान शंभराहून अधिक सर्व धर्मिय नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे.यावेळी कमेटीचे अध्यक्ष जमशिद (लारा) शेख, कार्याध्यक्ष हाजी आरिफ शेख, सर्व कमिटी पदाधिकारी मोलाचे सहकार्य राजु इसुफ शेख, आदी प्रमुख उपस्थित होते.त्याचप्रमाणे जशने ईद मिलाद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या कडून आज रात्री इमाम अहमद रजा मदरसा मधील मुला, मुलींचा प्रोग्राम आयोजित केले असून ६ डिसेंबर ला तकरीर ( प्रवचन ) नात याचे आयोजन केले असून ०७ डिसेंबर तारखेला कवाली चा शानदार मुकाबला होणार आहे या कव्वाली मध्ये टीव्ही स्टार अजीम नाजा आणि दुसरे कव्वाल नौशाद अली खान (दिल्ली) येथून येणार आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही दिवस येणाऱ्या सर्व पाहुण्यांना जेवणाची सोय मिलादुनबी कमेटी कडून करण्यात येत असल्याची माहिती कमेटीचे अध्यक्ष जमशिद (लारा) शेख यांनी बोलताना सांगितले आहे.
