मोखाडा :सौरभ कामडी
कोलकाता मधील एक महिला डॉक्टर तसेच बदलापूर मधिल ४ वर्षांच्या २ मुली व प विरार मधली संतापजनक घटना तसेच काल जव्हार तालुक्यात असलेले ओझर येथील एक संतापजनक घटना २८ ऑगस्ट रोजी एका परप्रांतीय परप्रांतीय नाराधामकडून एक पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचा फिर्याद जव्हार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जव्हार तालुक्यातील युवा आदिवासी संघ, तसेच श्रमजीवी संघटना, जव्हारकर, सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी जव्हार पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंदन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४,६५,६५ (१), पोक्सो ४, ८ कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इस्तियाक अन्सारी याला अटक करण्यात यश मिळालेला असून यामध्ये आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जव्हार व मोखाडा मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी चौक जव्हार येथे युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार संघाचे सर्व पत्रकार, सरपंच संघटनेचे सर्व सरपंच, महिला वर्ग व सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध नोंदवला आहे.