Type Here to Get Search Results !

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा लोकार्पण सोहळा


सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा पार पडला

आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे खेड या मध्ये प्रमुख्याने पारगाव फाटा ते पारगाव या रस्त्याचा समावेश असून या सोबतच या भागातील इतर रस्ते व पठारेवस्ती येथील सभामंडपाचा समावेश देखील आहे तसे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरातील कुरवंडी, थुगाव-कोल्हारवाडी, भावडी, कारेगाव आणि पेठ या गावांतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले 

तसेच याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भातील निवेदन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले, कार्यक्रमाच्या वेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ग्रामस्ताना व आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी विविध पदाधिकारी, सर्व गाव चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह या विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनीधी :- आकाश भालेराव 
आंबेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad