Type Here to Get Search Results !

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी 6 कोटी 2 लाख रुपयांचा एमडी अमली पदार्थ जप्त



अंमलीपदार्थ तस्करीतील अट्टल गुन्हेगार जेरबंद
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज मोहीम पार पाडली आहे. 
अंमली पदार्थ मेफेड्रोन व ड्रग्स तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार जेरबंद करण्यात आला आहे. 
ही कारवाई सोलापूर जिल्ह्यात मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे- सोलापूर महामार्गावर देवडी पाटी येथे करण्यात आली. 
कारवाईत 6 कोटी 2 लाख रुपयांचा एमडी नावाचा अंमलीपदार्थ या आढळला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad