Type Here to Get Search Results !

लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती लालासाहेब देशमुख भाजपात

लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती लालासाहेब देशमुख भाजपात ...


लातूर - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लालासाहेब देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि भाजपाच्या विचारधारेवर विश्र्वास ठेवत असंख्य नेते व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. 


त्याच अनुषंगाने बाजार समितीचे माजी सभापती लालासाहेब देशमुख यांनी भाजपाच्या विचारधारेला आपले मानत पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेपालकमंत्री गिरीष महाजन, आ. आशिष शेलार,आ. अभिमन्यू पवार, खा. सुधाकर शृंगारे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, बाबू खंदाडे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश घेतला.


काँग्रेस पक्षाचे खंदे कार्यकर्ते लालासाहेब देशमुख यांच्यासह राजाराम गलांडे, मांजरा साखर कारखाना संचालक विष्णुदास शिंदे, सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कदम, हणमंतराव साळुंके,खोपेगावचे माजी सरपंच नीळकंठराव गोरे, माजी सरपंच हणमंत पवार, प्रल्हाद गोरे, माजी सरपंच श्रीपती जांभळदरे, खोपेगाव तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत मोरे यांच्यासह काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad