Type Here to Get Search Results !

पंढरपूर | राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे सन्मानित


देवडे गावात महिला सरपंच यांना आदर्श सरपंच पुरस्कार भेटला. देवडे ता.पंढरपुर जि. सोलापुर या छोट्याशा गावामध्ये आदर्श सरपंच पुरस्कार भेटला असुन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडुन राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांना प्राप्त झाला असून गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे,२७०० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये पहिल्यांदा आदर्श पुरस्कार भेटला असुन ग्रामपंचायत ने वेगवेगळे निर्णय घेण्यात आले असुन, मगील महीण्यामध्ये राज्यामधील पहिली ग्रामपंचायत ठरली जिने सरपंच योजना सुरू केली, असे उपक्रम राबवून आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे, राज्यातील ५० ग्रामपंचायतींना आदर्श पुरस्कार दिला गेला आहे या मधील देवडे गाव आहे,हा आदर्श सरपंच पुरस्कार सौ.प्रमिला झांबरे यांना पुरस्कार सरपंच संघटनाचे नेते मा.बाबासाहेब पावसे,हिवरेबाजार पद्मश्री मा.पोपटराव पवार यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी सरपंच प्रतीनिधी सोमनाथ झांबरे, सदस्य हिम्मंत कडलासकर, सदस्य चांगदेव पाटील, सदस्य सचिन कडलासकर, सदस्य विजय मोरे,युवा नेते सागर कडलासकर, विण्णु भोसले, यादी ग्रामस्थ उपस्थित होते. आदर्श सरपंच सौ.प्रमीला झांबरे यांनी सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य व गावातील ग्रामस्थ यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad