Type Here to Get Search Results !

बेशिस्त वाहन चालकावर कारवाईचा बडघा



डोंबिवली/ भानुदास गायकवाड


डोंबिवली कल्याण मध्ये वाहन चालकाचा बेशिस्त पणा वाढत चालल्याच्या अनेक घटना वाहतूक विभागा कडे आल्या होत्या , अनधिकृत रिक्षा चालकांची दादागिरी ,ओव्हर सीट, ट्रिपल सीट अश्या अनेक तक्रारी वाहतूक विभागा कडे आल्या होत्या त्या अनुषंघाने




  आज दिनांक 05/6/2023 रोजी डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी संयुक्तपणे टिळक चौक,डोंबिवली पूर्व व दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट परिसर डोंबिवली पश्चिम येथे दुपारी विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे, यासह इतर वाहतूक नियम मोडणारे रिक्षाचालक तसेच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चार चाकी अशा एकूण 62 कसूरदार वाहनावर धडक कारवाई करण्यात आली असून 1,45,450/-रुपये दंड आकारण्यात आला आहे. बेशिस्त वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेसह ही संयुक्त कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मा. उमेश गित्ते साहेब यांच्या कडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad