Type Here to Get Search Results !

उत्तर सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा



उत्तर सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिन आणि विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वेदमंत्रांच्या साक्षीने छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक घालण्यात आला.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.




कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे जेष्ठ सदस्य चंद्रसेन पाटील यांनी केली तर सूत्रसंचालन कृष्णात माने यांनी केले संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 137 जणांनी रक्तदान करून रक्तदानाची परंपरा कायम ठेवली आहे.याचबरोबर संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन हे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.




सदरच्या कार्यक्रमास शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे, सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली भाऊ पवार, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद दादा भोसले आणि माजी नगरसेवक अनंत नेता जाधव यांच्यासह बाळासाहेब माने, नानासाहेब जाधव, शिवाजी पाटील, मालाजी पाटील, दिलीप जाधव, पांडुरंग रोकडे, विठ्ठल लांमतुरे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad