क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2022 च्या आयपीएल प्रमाणे यंदाही फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला असून याची घोषणा करण्यात आली आहे. चेन्नई आणि गुजरात यांच्यात आज फायनल सामना होणार आहे. परंतु पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं सामना होणार की नाही हे सांगता येत नाही. आज सामना न झाल्यात उद्या हा सामना खेळवण्यात येईल. उद्या देखील अशीच परिस्थिती राहिली तर दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाईल