सोलापूर दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी, नाव न घेता रोहित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे.
नाना पटोलेंनी सोलापूर आणि माढा लोकसभेवर काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आहे, असं कार्यकर्त्यांना सांगितलं. इथे कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल, हे खपवून घेणार नाही, असे म्हणत पवारांना टोला लगावला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी सोलापूरची जागा राष्ट्रवादीकडे देण्याचे वक्तव्य केले होते.