Type Here to Get Search Results !

मोहोळ | सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मान्यतेविना दारू दुकानाला परस्पर मंजुरी ग्रामसेवक निलंबित



सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मान्यतेविना दारू दुकानाला परस्पर मंजुरीचा ठराव दिल्याप्रकरणी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील ग्रामसेवक संतोष पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. पेनुर येथील ग्रामसेवक संतोष पाटील यांनी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मद्य विक्री दुकानाला मंजुरीचे ठराव दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad