दिनांक 08/05/2023 रोजी रात्री 11:30 ते दिनांक 09/05/2023 रोजी दुपारी 4:45 या दरम्यान अश्विनी तुकाराम बाणखेले यांच्या हत्ती गवताचे शेतात, बाणखेले मळा, तपनेश्र्वर मंदिराच्या जवळ मंचर ता. आंबेगाव जि.पुणे येथे अंजना प्रभाकर बाणखेले वय 78 वर्षे यांच्या अंगावरील दागिने चोरी करण्याच्या उद्दशाने यांना त्यांच्या घराच्या पाठीमागे असणारे अश्विनी तुकाराम बाणखेले यांच्या हत्ती गवताच्या शेतात घेऊन जाऊन अंजना प्रभाकर बाणखेले यांना कश्याच्या तरी सहायाने जीवे ठार मारून त्यांच्या आंगवरील सुमारे 1,30,000/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून चोरटे फरार झाल्याची घटना मंचर या ठिकाणी घडलेली आहे अंजना प्रभाकर बाणखेले यांच्या आंगावरील दागिने हे 30,000 रू अंदाजे साडेसहा ग्रॅम वजनाचे मंगळ सूत्र , 50,000/- रू एक सिंगल पदरी सोन्याचे आणि काळे मन्यांमध्ये ओवलेले मंगळ सूत्र त्याला सोन्याचे पेंडेंट असलेले त्याचे वजन अंदाजे 10 ग्रॅम असलेले , 50,000/- रू कानातील सोन्याचे कुद्यांचा जोड त्याला वेल असलेले त्याचे वजन अंदाजे एक तोळा असे एकूण 1,30,000/- दागिने चोरट्यांनी चोरले असून या संदर्भात मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 193/2023 भडवी कलम 302,397 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.नि सतीश होगडे हे करीत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर