Type Here to Get Search Results !

भाजपा शहराध्यक्ष रोहित जी वर्मा यांनी वाढदिवसाच्या अवचित साधून जपले दायित्व.



भाजपा शहराध्यक्ष रोहित जी वर्मा यांनी वाढदिवसाच्या अवचित साधून जपले दायित्व.


ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर.


एरवी वाढदिवस म्हटलं की भर रस्त्यामध्ये केक कापून मित्रांसोबत डीजेच्या तालावर नाचणारी मुले मित्रमंडळी पहावयास मिळते.किंवा नेते मंडळी सोबत मोठ मोठ्या हॉटेलमध्ये , व बॅनर बनवून वाढदिवस साजरा केला जातो. असे न करता भाजपा शहर अध्यक्ष रोहितजी वर्मा यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने शहरातील महिला सफाई कामगार गाव स्वच्छ करणाऱ्या महिलांना साडीचोळी देऊन महिलांचा सन्मान करून वाढदिवस साजरा केला गेला.




स्त्रीला अनन्य साधारण महत्व असून देखील बहुतांश वेळेस तिला पाहिजे तेव्हढा मान समाजात मिळत नाही.आजची स्त्री आबला नसून सबला आहे. एरवी स्त्रीची आठवण फ्कत मातृदिन,जागतिक महिलादिन, अथवा भाऊबीज,रक्षाबंधन याच दिवशी होते.त्याच दिवशी मर्यादित काहीजण थोड्याबहु प्रमाणात महिलांना आदर दिला जातो व याच दिवशी महिलांची कदर केली जाते.परंतु महिलांना सदैव मान सन्मान मिळावा ती समाजात स्वतंत्र पने वावरावी स्त्री शक्तीचा नेहमीच कौतुक व आदर करावा हेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रोहितची वर्मा यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून दायित्व जपत महिलांना आदर देत त्यांनी साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसून आली व त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी झळाळून दिसत होती.ते आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करीत असतात. काही ना काहीतरी समाज उपयोगी दायित्व जपत असतात. एरवी पण कुणाच्याही संकटकाळी धावून जाऊन ते गरजू व्यक्तीची सावली म्हणून उभे राहतात. म्हणूनच या दिवशी त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या राहत्या घरी गावातील तरुण, ज्येष्ठ, पत्रकार ,विविध पक्षातील नेते मंडळी लहान थोरापासून सर्वसामान्य गावातील मंडळी बऱ्याच प्रमाणात उपस्थित होती. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने गावात त्यांचे कुतूहल होत आहे. त्यांच्या या अनोखी उपक्रमांनी महिलांसाठी बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्यांची मित्र मंडळी व युवा पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाढदिवसाच्या दिवशी अनाठायी खर्चाला बगल देत देश व समाज उपयोगी काहीतरी दायित्व जपण्याचा जो तो प्रयत्न करीन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad