Type Here to Get Search Results !

माळशिरस | वेळापूर गौतमी पाटिलच्या कार्यक्रमात झाला राडा



माळशिरस | वेळापूर गौतमी पाटिलच्या कार्यक्रमात झाला राडा




माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पालखी मैदानावर श्री अर्धनारी नटेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमात राडा झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना वेळापूर पोलिसांनी चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,



गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी दंगा केल्याने 'गौतमीने' डान्स थांबवून आयोजकांना परिस्थिती लक्षात आणून दिल्याचही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंडव्हायरल होताना दिसतात.



नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लील डान्स करत असल्याची टीका तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गैरवर्तवनामुळे गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी आणण्याची मागणीही होतेहोती. तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

माळशिरस | वेळापूर गौतमी पाटिलच्या कार्यक्रमात झाला राडा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad