Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | पोलिसांची मोठी कारवाई ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


   मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई,


अवैध गुटख्या विरोधात मंगळवेढा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 42 लाख रूपयांचा 297 पोती पानमसाला व गुटखा जप्त केला आहे.


निपाणी येथून ट्रक भरून पान मसाला व तंबाखू मुक्त सुगंधी गुटखा सांगोला मार्गे सोलापुरात विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मंगळवेढा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी सापळा लावून ट्रक पकडला.ट्रकमध्ये महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असलेला सुमारे 42 लाख रूपयांचा विविध कंपन्यांचा 297 पोती गुटखा आढळुन आला. पोलिसांनी गुटखा व ट्रक जप्त करून चालक राजू चंद्रकांत व्हनमाने याच्यासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies