Type Here to Get Search Results !

सोलापूर | जनहित शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा परिषदेच्या टेरेसवर चढून आंदोलन



सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत घरकुल योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचारा प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या टेरेसवर चढून आंदोलन करण्यात आले.



भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही अन्यथा उडी मारून आत्महत्या करेन, असा इशारा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबाराजे कोळेकर यांनी दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक जनहित शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या टेरेसवर चढले. त्या ठिकाणी आपला फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.




घरकुल योजनांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, गायरान जमिनीमध्ये झालेला भ्रष्टाचार याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कोळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या आंदोलनाची माहिती मिळताच सदर बजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे जिल्हा परिषदेत दाखल झाले.




त्यांनी तातडीने टेरेसवर जाऊन संबंधित कार्यकर्त्याना खाली आणले. आंदोलन हे लोकशाही पद्धतीने नाही या भूमिकेतून पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad