Type Here to Get Search Results !

मोहोळ | नरखेड येथे चोरट्यांचा एकावर तलवारीने हल्ला



मोहोळ | नरखेड येथे चोरट्यांचा एकावर तलवारीने हल्ला


मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील आयडिया (जिटीएल) या टॉवरमधील केबल चोरून नेत असताना नितीन चांगदेव मोटे (रा. नरखेड ता. मोहोळ) यांनी चोरट्यांना अटकाव केला म्हणून त्यांच्यावर 5 चोरट्यांनी तलवारीने हल्ला केला. त्यातील दोघांना नागरिकांनी पकडले असून तिघे चोरटे पळून गेल्याची घटना दि. ११ एप्रिल रोजी रात्री १२ : ३५ वाजनेच्या सुमारास घडली. रोहन रावसाहेब धोत्रे (रा. पंढरपूर) व अविनाश परशूराम गायकवाड (रा. कोडंवा, पुणे) अशी नागरिकांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर तीन आरोपी पळून गेले आहेत. याबाबत नितीन चांगदेव मोटे (रा.नरखेड) यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad