चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला तेल लावत शिवसैनिकाकडून जाहीर निषेध
सध्या भाजप नेते चंद्रकांत पाटल यांनी जे बेताल वक्तव्य केलेल आहे की बाबरी मशीद बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी पाडली नाही या वक्तव्यामुळे शिवसैनिका मधे प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे म्हणून युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक फोटोवर डोक्यावर खोबरेल तेल ओतून त्यांचं डोकं शांत करण्याचा प्रयत्न करीत निषेध केला आहे.
इथून पुढच्या काळात ते असच बेताल वक्तव्य करत राहिले तर चंद्रकांत पाटलांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.
यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे, युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे, रमेश काकडे, मिलिंद मोरे यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते.