Type Here to Get Search Results !

अक्कलकोट | कुस्तीच्या वादातून नागणसुर मध्ये दोन गटात मारामारी.



नागणसुर मध्ये दोन गटात मारामारी


अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथे कुस्ती फडात झालेल्या वादातून दोन गटात दगडाने व काठीने जबरदस्त मारामारी झाली आहार. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत


12 लोकांवर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.रविकांत बंथनाळ याने फिर्याद दिली आहे.महेश तेगीनकेरी यांना बसवराज सिद्धाराम प्रचंडे,कुस्तीच्या वादातून शिवानंद बंथनाळ व पैलवान दरेप्पा तोळनुरे, भीमाशंकर तोळानुरे यांनी काठीने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी शिवानंद तोळनुरे, बसवराज तोळनुरे यांनी सोडविणाऱ्या फिर्यादी यांना शिवीगाळ केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाडीवाले करत आहेत.


तर शरणप्पा तोळनुरे यांनी दुसरी फिर्याद दिली आहे. त्याचा मुलगा शिवानंद तोळनुरे यास रवी बंथनाळ आकाश गंगोडा यांनी खाली पाडून महेश तेगीनकेरी याने दगडाने मारहाण केली आहे. त्याचवेळी बसवराज प्रचंडे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यास भीमाशंकर गंगोडा व श्रीशैल गनचेरी, रमेश तेगीनकेरी यांनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी बसवराज प्रचंडे व दरेप्पा तोळनुरे, शिवानंद तोळनुरे भीमाशंकर तोळनुरे बसवराज तोळनुरे रां नागणसुर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad