Type Here to Get Search Results !

सोलापूर | सराफ बाजारातून एक लाखाची रोकड लंपास



सराफ बाजारातून एक लाखाची रोकड लंपास


सोलापूर शहरातील सराफ बाजारातून मोटरसायकलच्या हँडलच्या बॅगमधून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याबाबत सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेतील रहिवासी पद्मकुमार उपाध्ये हे आपल्या पत्नीसह सोने खरेदीसाठी सराफ बाजारात आले होते. खरेदीनंतर सराफ बाजारातील एका दुकानासमोर लावलेली मोटरसायकल बाजूला घेत असताना हँडलला अडकवलेल्या बॅगेतून तीन अज्ञात महिलांनी एक लाखाची रक्कम लंपास केली. याप्रकरणी पद्मकुमार उपाध्ये यांनी जोडभावी पेठ पोलिसात रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad