Type Here to Get Search Results !

फलटण धोम-बलकवडी पाण्याची खरी दावेदार शिवसेनाच (उद्धव बाळासाहेब ठाकरे)



फलटण धोम-बलकवडी पाण्याची खरी दावेदार शिवसेनाच (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचा उद्घाटन समारंभ शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांच्या हस्ते व शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शाखा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. सदर शाखेसाठी शाखाप्रमुख प्रशांत निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना विभाग प्रमुख तुषार वाडकर, युवासेना विभाग प्रमुख अक्षय झेंडे, मनोज गोसावी, दत्ता बनकर, संतोष शिंदे, माऊली मुळीक, कल्याण निंबाळकर, आदींचे विशेष सहकार्य लाभले.


उद्घाटनप्रसंगी वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांना संबोधित करत शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी राज्यातील सत्ताधा-यांवर चौफेर फटकेबाजी केली. इडी, सीबीआय, एनआयए, आदी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन शिवसेना संपवण्याचा सत्ताधा-यांचा खटाटोप सुरु असल्याची टीका करुन शेवटी लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात विजय हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच होईल. शिंदे-फडणवीसांचे सरकार लवकरच कोसळेल व महाराष्ट्र राज्यात सध्या शिवसेनेचीच लाट आहे व निवडणूका लागल्यानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी शिवसैनिक व ग्रामस्थांना संबोधित करताना फलटण तालुक्यात पाण्याचा श्रेय वाद सुरु आहे. धोम-बलकवडीच्या पाण्यासाठी भगीरथ - जलनायक अशी स्पर्धा सुरु आहे. परंतु कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना 1996 साली केली आहे. फलटण तालुक्यात आलेल्या कृष्णा खो-यांतर्गत धोम-बलकवडीच्या पाण्यावर शिवसेनेने फलटण तालुक्यात कधीही अधिकार सांगितला नाही. परंतु श्रेयवादाची लढाई पाहता फलटण तालुक्यातील नागरिकांनी जागरुक होणे गरजेचे आहे. कारण या धोम-बलकवडी पाण्याचे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे खरे जनक हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व खरी दावेदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षच आहे. अशी शिवगर्जना करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट व घोषणा देऊन एकप्रकारे अनुमोदनच दिले. फलटण तालुक्यातील कचरा डेपो, प्रदुषण, मुता-यांचा अभाव, अस्वच्छता, महागाई, बेरोजगारी, रस्ते, पाणी, वीज आदी समस्या फलटण तालुक्याला भेडसावत असल्याची टीका यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केली.


शिवसेना फलटण तालुका प्रमुख विकास नाळे यांनी वाठार निंबाळकर येथे संबोधित करताना ग्रामस्थांनी आपापल्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना शाखा जनसंपर्क कार्यालयाचा लाभ घ्यावा व शिवसेना पक्ष मजबुत करावा असे आवाहन केले. यावेळी शहरप्रमुख निखिल पवार, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, विभाग प्रमुख महेंद्र घाडगे, ग्रा.सं.कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण, उपजिल्हा प्रमुख भारत लोहाना, महिला आघाडीच्या सुशिला जाधव, फरांदवाडी ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन ननावरे, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, आरोग्य सेनेचे शैलेंद्र नलवडे, उपशहर प्रमुख राहुल पवार, मलठण शाखाप्रमुख अक्षय तावरे व मंगेश खंदारे, संपत निंबाळकर, शांताराम भंडलकर, आदी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News