Type Here to Get Search Results !

पंढरपूर | करकंब स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी वाळू चोरी करून नेणाऱ्या हायवा ट्रक वर कारवाई



पंढरपूर | करकंब स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी वाळू चोरी करून नेणाऱ्या हायवा ट्रक वर कारवाई 


पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली.


वाळू चोरी करणाऱ्या हायवा सव्वा पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पंढरपूर ते करकंब रस्त्यावरून एक हायवा ट्रक भरधाव वेगाने करकंबच्या दिशेने जाताना दिसला. त्याचा पोलिसांनां संशय आल्याने लागलीच त्याचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडून चेक केले असता, सदर वाहनाच्या पाठीमागील हौदामध्ये एकूण ४ ब्रास वाळू मिळून आली. चालकाकडे सदरबाबत विचारपूस केली असता सदरची वाळू ही शिरढोण ता. पंढरपूर येथून भिमा नदी पात्रातून उपसा करून वाळू विक्री करीता घेवून जात असलेबाबत सांगितले. सदर वाळू वाहतूकी बाबत त्याचेकडे परवानाबाबत ( पावती ) विचारपूस केली असता त्याचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे हायवा ट्रकसह चालकास ताब्यात घेवून एकूण 15 लाख 28 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad